विद्यार्थ्यांना तिरंगी छत्रीचे वाटप

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जुलाई महिन्याच्या मंथली चाचणी परीक्षेत यश संपादन केले. प्रोत्साहन पर बक्षिसे म्हणून पावसाळी हंगाम विचारात घेता छत्री भेट देण्यात आल्या.

स्वातंत्र्य दिन या अनुषंगाने अशोकदादा गरुड शैक्षणिक - समूहाचे ज्ञानविकास विद्यालय वतीने केसरी, पांढरा, निळा, हिरव्या रंगाच्या छत्री वाटप करण्यात आल्या. 

गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे : कैवल्य शेजुळ, प्रथमेश गणेश शिंदे, अभिषेक निकम, भूमेश भोसले, प्रज्ञा साखरे, अस्मिता भोसले, सरफराज दुलोत, प्रतिक जंगले, अली पटेल, ऋतुजा काकडे, आर्यन वाघ, ज्ञानेश्वरी साळुंके, सार्थक कदम, रविराज शिरसाठ, वेदांत काकडे, रुद्र आग्रे, समृद्धी साळवे, राज पंढरिनाथ कोलते, सार्थक नेव्हारे, जान्हवी कबाडे, वेदिका गवळी, सोहम आग्रे, ओम मुरकुटे, हर्षल आग्रे, गौरव सुसून्द्रे, दिव्या माचवे, अनिकेत जाधव, श्रद्धा खाकरे, जुनेद पटेल, रेणुका जंजाळ, यश अक्कर, प्रणव निकम आदींनी बक्षिसे मिळविले. 

यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद शालेय वाहनाचे चालक मालक आदी हजर होते.